मराठी माणुस

                            माझ्या मराठी मातीचा 
                             लावा ललाटास टिळा 
                            हीच्या संगाने जागल्या 
                          दर्‍या खोऱ्याततील शिळा
कुसुमाग्रजांच्या ह्या ओळींनी उरअभिमानाने भरुन आला नाही तर तो नक्कीच मराठी माणूस असु शकत नाही. मराठी माणुस म्हटलं की डोळ्यासमोर द्रुश्य उभं राहतंतते मिळुन मिसळुन राहणारा चेहऱ्यावर नेहमी हास्य असणारा, सर्व सण उत्सव उत्साहाने साजरा करणारा पण स्वाभिमान दुखावला की चवताळून उठणारा , मोडेन पण वाकणार नाही असे समोरच्याला ठणकावून सांगणारा, आपल्या तत्वावर ठाम असणारा, असा हा मराठी माणुस ! 
वाद म्हटलं की तो चार हात लांबच असतो आणि उत्सवाच्या वेळी मात्र उत्साहाने ढोल पथकात सामील होतो. थोडक्यात काय तर मराठी माणुस तोच, जो अभिमानाने म्हणतो
                    आमुच्या मनामनात दंगते मराठी 
                     आमुच्या उराउरात स्पंदते मराठी 
                    आमुच्या नसानसात नाचते मराठी 
                      आमुच्या रगारगात रंगते मराठी       
 इ. स. 1600 ते 1700 हया कालखंडात मराठी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि मराठी भाषेवरील फारसि शब्दांचे आक्रमण थंडावले . मराठीला अस्मिता प्राप्त झाली. महाराजांबरोबर संत द्न्यानेश्वरांनीही मराठीचे महत्व जाणले होते म्हणूनच त्यांनी मराठीतच काव्य रचनेचा आग्रह धरला.नाथांना मराठीची थोरवी कळली होती त्यांनीही मराठीतच अभंगरचना केली, संत तुकोबांनी आपले विचार मराठीतच पर्खडपणे मांडले ,जनजाग्रुती साठी रामदासांनीही मराठीच वापरली. ह्या सर्वानी मराठीचा पाया रचला तर पुढे वि. स. खांडेकर , वि. वा. शिरवाडकर , पु. ल. देशपांडे श, शांता शेळके ,शिवाजी पाटील अशा अनेकांनी मराठीचा कळस उंच उंच नेला आणि मराठीला अभिजात साहित्य संस्कृतीचा वारसा लाभला .
पण प्रत्येक नाण्याच्या दोन बाजु असतात तसचं इथेही मराठीचा अभिमान बाळगणारे  मराठीचा तुरा मानाच्या शिरपेचात खोचणारे एक तर दुसरीकडे मराठी असुन मराठी न बोलणारे,  मराठीला अगदी सहज downmarket संबोधणारे त्यांना असं का वाटतं एक कोड्यात टाकणारा प्रश्न आहे!  आपल्या नेहमीच उदाहरण घ्या ना पाणीपुरी खायला गेल्यावर अगदी ठसक्यात सांगतो कि भैया दो पाणीपुरी देना और थोडा तिखा! का ??असंही सांगू शकतोच ना दादा दोन पाणीपुरी तिखट जास्त .ते जर मराठी शिकायला तयार नसतील तर त्यांच्यासाठी आपण का बदलायचं ?केरळ, कर्नाटक ,युपी-बिहार कुठेही गेला तरी तिथे दुकानांचे बोर्ड त्यांच्या स्थानिक भाषेतच असतात आपल्या इथे महाराष्ट्रात मात्र हे प्रमाण फारच कमी आहे .काही ठिकाणी तर मराठी माणूस बाकीच्यांशी सोडा पण मराठी माणसाशी सुद्धा हिंदी मध्ये बोलतो त्यामुळेच पु ,ल.नी म्हटलं आहे की," मराठी माणसाने परप्रांतीयांशी बोलताना मराठीतूनच बोलले पाहिजे तुम्हीच जर हिंदीमधून बोललात तर समोरचा कशाला मराठी बोलेल मराठी मुळे आपले अडत नाही असा त्यांचा गैरसमज यामुळे झाला आहे ! "
मराठी इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे आज मराठी बोलणारे एकूण नऊ करोड आहेत पण नक्की मराठी बोलणारेच का ?यावर प्रश्नचिन्हच आहे!  या 9 करोड मधील सर्वच जण रोजच्या रोज मराठीत बोलतात हे ठामपणे कोण सांगू शकतो ?? सहज कोणालाही प्रश्न विचारला की मराठी माणसा बद्दल तुझं मत काय तर तो प्रतिप्रश्न करतो की तो मागे आहे याबद्दल विचारतोय की त्याच्या अस्मिते बद्दल? आता यावर काय बोलणार म्हणजे मराठी माणसाची अस्मिता आहे हे तर नक्की मग तो मागे आहे असे म्हणणे का?विरोधाभास असावा पण एवढा !स्वतःची अस्मिता असणारा माणूस मागे कसा काय राहू शकेलआणि तो नक्कीच मागे नाही मराठी माणसाला स्वराज्य उभं करता येतं, मराठी माणसाला राज्य घटना लिहिता येते ,मराठी माणसाला चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवता येते , मराठी माणसाला पार्श्वगायनात सम्राज्ञी बनता येतं, मराठी माणसाला क्रिकेटचा शहेनशहा बनता येतं, मराठी माणसाला पहिली महिला राष्ट्रपती बनता येतं, मराठी माणसाला पहिला इंडियन आयडॉल बनता येतं,  मराठी माणसाला जागतिक किर्तीचा शास्त्रज्ञ बनता येतं, मराठी माणसाला महासंगणक बनविता येतो,  ही मराठी माणसे महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची अस्मिता आहेत! आणि या अस्मितेचा वारसा पुढे चालवणाराच खरा मराठी माणूस आहे .  
खरंतर मराठी भाषा सतत बदलत असते आणि आपणही ते बदल सतत आत्मसात करुन घेत असतो.आता मराठीत बोलायचं म्हणजे इतर भाषांवर अगदीच बहिष्कार टाकायचा असा अर्थ होत नाही, मराठीचे ते संस्कार नक्कीच नाहीत ! नाहीतर उद्या मराठीचा कट्टर समर्थक म्हणायचा आज मी दुग्धशर्करायुक्तघनगोलगट्टू खाल्ला !तर एवढी टोकाची भूमिका घेण्यापेक्षा आज मी आईस्क्रीम खाल्ला आहे जास्त सोपे वाटत नाही का ?? ही सगळी भाषेत पडलेली नवीन शब्दांची भर आहे . अनेक संस्कृत शब्द आपण मराठी समजूनच वापरतो शिवकालात निकटचा  संबंध आलेले फारसी आणि अरबी शब्दही अगदी सराईतपणे मराठी भाषेमध्ये वापरतो . इंग्रजांनी आपल्यावर दीडशे वर्षे राज्य केले एवढ्या काळामध्ये भाषेतले बदल अंगवळणी पडणे अगदी सहाजिकच आहे. भाषेची शब्दसंपत्ती अशीच वाढत जाते आणि हे शब्द समजून घेणे म्हणजे आपली भाषाविषयक ज्ञान वाढवणे होय.
एकुणच काय  मराठी जशी ज्ञानदेव - तुकारामाची, केशवसुत -गडकरींची , मर्ढेकर -महानोरांची तशीच आपलीही आहे, तिची सारी बदलणारी रूपे समजून घेत आपण तिची जपणूक केली पाहिजे , तिच्यावर प्रेम केले पाहिजे . कारण खऱ्या मराठी माणसाला, मराठी असे आमची मायबोली या व्यक्तींचा कधीही विसर पडता कामा नये .
शेवटी मराठी माणूस मराठी माणूस म्हणजे कोण?
तर दिवस-रात्र ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता आपल्या विठ्ठलाच्या ओढीने , त्याच्या एका दर्शनासाठी मैलोंमैल चालत जातो वारकरी म्हणजे खरा मराठी माणूस, कितीही उच्च पदावर पोचला तरी आई वडिलांच्या आशीर्वादालाच अमृत मानतो तो खरा मराठी माणुस, थर्टी फर्स्ट ची पार्टी केली तरी ही गुढीपाडवा अभिमानाने व उत्साहाने साजरा करतो तो खरा मराठी माणूस, बाहेर कितीही पिझ्झा-बर्गर खाल्ला तरी ज्याची भूक आईच्या हातच्या वरण भातानेच भागते तो खरा मराठी माणुस,मराठी साहित्याचे गोडवे गातो मराठी माणूस ,आणि लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असे अभिमानाने बोलतो तो खरा मराठी माणूस! 
एखादी मराठी मुलगी जशी नऊवारी नेसून,  दागदागिने घालून सुंदर दिसते तशीच आपली मराठी ही काना , मात्रा , वेलांटी या अलंकारांनी सजलेली आहेती वळवावी तशी वळते आणि प्रत्येक मैलाच्या अंतरावर नवीन रूप घेते! 
                         ओठी जनांच्या रुळु दे मराठी 
                           नाती मनाची जुळुदे मराठी
                         नसानसातून पळू दे मराठी
                         साऱ्या जगाला कळू  दे मराठी

Comments

Post a Comment