Posts

Showing posts from August, 2020

मायानगरी!

Image
"ए दिलं है मुश्किल जिना यहा  जरा हटके जरा बचके ये है मुंबई मेरी जान" मुंबई म्हटल की प्रचंड गर्दी , मुंबई म्हटलं की लोकल्स ची धडधड, मुंबई म्हटल की घडाळाच्या काट्यावर चालणारी माणसं , मुंबई म्हटल की गाड्यांच्या गर्दीने नटलेले रस्ते आणि मुंबई म्हटल की दिवसभरात करोडोंची उलाढाल करणारे असंख्य उद्योग आणि त्यांच्यावर चालणारी कित्येक कुटुंब ! एक जिवंत शहर म्हणून कोणाचा उल्लेख करायचा झालाच तर नक्कीच  मुंबई पहिली डोळ्यासमोर येते.  झपाट्याने चौफेर वाढणारे शहर असा मुंबईचा उल्लेख केला जातो आणि त्यात वावगे असे काहीच नाही ..  मुंबईचं बारसं कोणी केलं यात एकवाक्यता नाही पण बॉम्बे म्हणा मुंबई म्हणा किवा मुंबापुरी म्हणा ...ही मायानगरी सर्वानाच वेड लावते यात काही शंका नाही.                     "हसण्याची गाण्याची मौजेची मुंबई                           रंगांची ढंगांची पाखरांची मुंबई                    सजण्याची ज...