मायानगरी!
जरा हटके जरा बचके ये है मुंबई मेरी जान"
मुंबई म्हटल की प्रचंड गर्दी , मुंबई म्हटलं की लोकल्स ची धडधड, मुंबई म्हटल की घडाळाच्या काट्यावर चालणारी माणसं , मुंबई म्हटल की गाड्यांच्या गर्दीने नटलेले रस्ते आणि मुंबई म्हटल की दिवसभरात करोडोंची उलाढाल करणारे असंख्य उद्योग आणि त्यांच्यावर चालणारी कित्येक कुटुंब !
एक जिवंत शहर म्हणून कोणाचा उल्लेख करायचा झालाच तर नक्कीच मुंबई पहिली डोळ्यासमोर येते.
झपाट्याने चौफेर वाढणारे शहर असा मुंबईचा उल्लेख केला जातो आणि त्यात वावगे असे काहीच नाही ..
मुंबईचं बारसं कोणी केलं यात एकवाक्यता नाही पण बॉम्बे म्हणा मुंबई म्हणा किवा मुंबापुरी म्हणा ...ही मायानगरी सर्वानाच वेड लावते यात काही शंका नाही.
"हसण्याची गाण्याची मौजेची मुंबई
रंगांची ढंगांची पाखरांची मुंबई
सजण्याची जगण्याची बघण्याची मुंबई
तोलाची मोलाची डौलाची मुंबई "
कोणे एके काळी मुंबईतली जमीन सुपीक नव्हती, ती तशी आत्ताही नाही म्हणा ,पण धान्य उत्पन्न वगैरे जेवढे आत्ता आहे तेवढे ही नवते . 1776 साली गव्हर्नर साहेबांनी वरळीला बांध घालायला सुरुवात केली आणि मुंबईला आकार मिळाला.
सात बेटांची मुंबई होती ...ही सात बेटं बुजवून मुंबईची जमीन वाढवली गेली आहे . बोरीबंदर , चिंच बंदर , कोळसे बंदर, उरण बंदर ,माहीम बंदर , भायखळा बंदर आणि भाऊचा धक्का अशा सात बंदरामधे ही मुंबई एकेकाळी पसरली होती. पण वरळीचा बांध घातल्यामुळे आणि महिमची खाडी बुजल्यामुळे महालक्ष्मी ,वरळी, परळ, माहीम ,माटुंगा इथे भातशेती पीकू लागली . काही ठिकाणी फळभाज्या पालेभाज्याही लावण्यास सुरुवात केली पण समुद्राचे खारे पाणी, खारी हवा यामुळे त्यात मर्यादा येत असत . पण भरणीचे काम मात्र तेव्हाही सुरूच होते आणि आजही सुरूच आहे.
निमे मुंबई सागरा माजी होती। बहु लोकवस्ती असीतै न होती।
महाघोर राने तशा शेत वाड्या। लघु झोपड्या झावळ्यांच्या कवाड्या़।।
असे वर्णन मुंबईच्या एका कवनात करण्यात आलंय.
काही मुंबईच्या जुन्या ओळखी सांगायचं म्हटल तर त्यात गुंफा मंदिर , किल्ले, लाल मैदान, भाऊचा धक्का, फ्लोरा फाऊंटन, धोब्याचा घाट, ही नावे प्रकर्षाने पुढे येतात .
हिंदू संस्कृतीचा वारसा सांगणारी मुंबईमधील प्राचीन गुंफा मदिरांचा तेजस्वी इतिहास आज जवळ जवळ पुसलाच गेलाय. ह्यामध्ये मंडपेश्र्वर गुहा (बोरिवली) , कान्हेरी गुंफा(बोरिवली), जोगेश्वरी गुंफा (जोगेश्वरी), महाकाली गुंफा (अंधेरी) ह्या प्रामुख्याने येतात.सिमेंट च्या वाढत्या जंगलात हिं गुंफा मंदिरं संकटांच्या विळख्यात अडकली आहेत.
याशिवाय मुंबईतल्या गिरणी कामगारांचा संघर्ष ह्या मुंबईने बघितला आहे . ज्याचा साक्षीदार आहे "लाल मैदान". परळ ला केईम हॉस्पिटल च्या आतल्या गल्लीत आहे लाल मैदान. मुंबईच्या गिरणी कामगारांचा इतिहास या लाल मैदानाशिवय पूर्ण होणारच नाही . 1951 साली मुंबईत कापड गिरणी आली तेव्हा पासून कष्टकऱ्यांचा गौरवशाली इतिहास सुरू झाला आणि त्यानंतर कपडगिरण्या इतिहासात विलीन झाल्या त्या लाखो कामगारांच भविष्य अधांतरी लटकवूनच .हे मैदान आणि त्याचा कोपर्यान कोपरा त्या गिरणी कामगारांच्या उद्ध्वस्त इतिहासाचा साक्षीदार आहे.
त्यानंतर "भाऊचा धक्का"ही भलीमोठी पाटी दिसते डॉकयार्ड जवळ, पण त्या पाटी मागे मराठी माणसाची मान अभिमानाने उंचावेल असा मराठी माणसाचा इतिहास आहे. 'लक्ष्मण भाऊ हरिश्चंद्र' या मराठमोळ्या कंत्राटदाराने स्वखर्चाने एक धक्का उभारला, आणि 1839 साली डॉकयार्ड जवळ कोकणातल्या प्रवाशांसाठी एक सागरी मार्ग खुला झाला. भाऊंनी बांधलेला धक्का म्हणून "भाऊचा धक्का" असे त्याचे नामकरण झाले. त्याकाळी मुंबईची 50 टक्के जोडणी ही या भाऊच्या धक्क्याने केली .त्या काळी भाऊचा धक्क्याचं वातावरण चैतन्यमय होत . आगबोटीचे भोंगे वाजले की सारे जण आपल्या बोटीतून आलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आतुरतेने पुढे जायचे. पण आज मात्र ह भाऊचा धक्का बर्याच जणांना माहीत ही नाही. एकेकाळी गजबजलेला भाऊचा धक्का आज फक्त पाटी पुरती शिल्लक राहिला आहे.
" मुंबई शहर गुलजार "
असे वर्णन एका लावणींत केलं आहे जे मुंबईकडे पाहिल्यावर सार्थ ठरत. ही मुंबई आपल्या लंडन प्रमाणे असावी अस ब्रिटिशांना वाटायचं त्यामुळे त्यांनी प्रत्येक वास्तूत तसा प्रयत्न केल्याचे दिसून येते. त्यांच्या शिल्पकलेचा अद्भुत नमुना म्हणाजे "फ्लोरा फाँटेन ". हे शिल्प म्हणाजे युरोपियन देखण्या तरुणीच्या मुर्त्या आहेत . चार दिशेला चार मुर्त्या आहेत आणि टोकावर फ्लोरा या रोमन देवीची मूर्ती आहे. उमलत्या कमळावरचं देखणं अस हे कारंजं नेहमीच शिल्पकाराना वेड लावत.
ह्या झाल्या काही जुन्या वास्तु ज्यावर काळाने जळमट आणली ...परंतु काही वास्तू अशा आहेत ज्यांचा काळाचा फेरा सुद्धा काही करू शकला नाही.
त्या सर्वात अग्रस्थानी ठरते ती ह्या 31 जुलैला जिला नाबाद 126 वर्ष पूर्ण झाली अशी मुंबई महानगरपालिकेची "मुख्यालय" इमारत. एवढ्या वर्षानंतरही ती आपले नयनरम्य सौंदर्य तसेच टिकवून आहे. मुंबईच्या संस्कृतीचा आरसा असणारी ही इमारत कित्येकांच्या जीवनात चमत्कार घडवून गेली. मुंबई शहराला नागरी सुविधा पुरविण्याचा 'रिमोट' असे ह्या मुख्यालयाला नक्कीच म्हणू शकतो .उभ्या जगाचं लक्ष ज्या मुंबईवर असत त्या मुंबईवर नियंत्रण हे मुख्यालय ठेवते .
2 डिसेंबर 1911 ल इंग्लंडचे बादशहा पाचवे जॉर्ज सहकुटुंब मुंबईला आले आणि त्यांच्या फक्त स्वागतासाठी गोल घुमटाची प्लास्टर ऑफ पॅरिस ची भव्य दिव्य अशी "गेट वे ऑफ इंडिया" ही वास्तू ब्रिटिशांनी उभारली. युरोपीय आणि गुजराती अशा अनोख्या वास्तुकलेची सांगड ह्या वास्तूत पाहायला मिळते .अपोलो बंदराची ओळख gateway बनली आणि देशी विदेशी पर्यटकांना get way दर्शन ही पर्वणीच ठरली. जवळ जवळ तीन एकशे चित्रपटात gateway ने काम केलंय तर त्याच्यासमोर फोटो काढून घेण्याची क्रेझ अजून काही सरली नाही .
Gateway तर gateway त्याच्यासमोर दिमाखात उभी असणारी "ताजमहाल"ची वास्तू देखील सर्वांचेच आकर्षण राहिली आहे. दिल्लीच्या ताजमहाल प्रमाणे भव्य दिव्य असावे म्हणून टाटा ग्रुप ने एक हॉटेल गेट वे समोर उभारले. आणि त्याचे नामकरण ही ताजमहाल असेच केले . पंचतारांकित हॉटेलच मुहूर्तमेढ या ताजमहालने रोवली. याशिवाय 'पारशी माणूस काय हॉटेल उभारणार ?' याला चोख प्रत्युत्तर मिळाले.
मुंबईचे तारुण्य कशात दिसेल हे सांगणे तसे अवघडच. मुंबईच्या सौंदर्याचा एक अनोखा नमुना म्हणजे "मरीन्स" .. पूर्वी ज्याला राणीचा कंठाहार म्हणायचे अस मरीन्स म्ह्णजे रात्रीच्या दिव्यांमधे झगमहून निघणारा विस्तीर्ण सागर किनारा . मुंबई मधला हा स्वर्ग रोज रात्री झगमगत असतो ज्याची कोणालाही अगदी सहज भुरळ पडते.
मराठी अस्मिता टिकवण्यासाठी झगडणारा मराठी आणि मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून प्राणांची आहुती देणारा मराठी यांचे दर्शन चर्चगेटच्या हुतात्मा स्मारकातून येते .1942 च्या लढ्याची आठवण करून देणारी ही पवित्र वास्तू! हे एक अर्थपूर्ण शिल्प आहे. बारा फुटांचा शेतकरी ज्याच्या हातात मशाल आहे आणि त्याच्याच बाजूला मराठी श्रमिक वर्गाचा तरुण प्रतिनिधी ह्या दोघांनीही ती मशाल धरून एक आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मुंबई शहराला पौराणिक वारसा आहे हे शहर प्राचीन शहर आहे. इथल्या दगड-माती , शिल्प वास्तूतून त्याला दुजोरा मिळत असतो.
फोर्ट म्हणजे किल्ला. एका बाजूला चर्चगेट दुसरीकडे अपोलो गेट तिसरीकडे बॉम्बे केसल आणि चौथी कडे बझार गेट. काळाच्या ओघात किल्ला नष्ट झाला आणि मुंबईला पाय फुटले पण फोर्ट शब्द कायमच राहिला.
मुंबईला चोर बाजार हा चोरी केलेल्यांचा बाजार असावा असं वाटतं पण प्रत्यक्षात तो चोरांचा नाही तर असंख्य दुर्मिळ वस्तू इथे उपलब्ध आहेत.
मुंबई च्या प्रत्येक ठिकाणाला स्वतःचा असा इतिहास आहे वेगळं नाविण्यपण आहे .
क्रॉफर्ड मार्केट, राजाबाई टॉवर ,फोर्ट , लालबाग, ग्रँट रोड,स्टॉक एक्साचेंज ची भव्य इमारत , नेहरू auditorium मुंबईचे डबेवाले, मुंबईची local , मुंबईचा गणेशोत्सव , सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी ,हाजीअली दर्गा, स्ट्रीट शॉपिंगसाठी फॅशन स्ट्रीट ,क्रॉस मैदान ,आझाद मैदान ,ओवल मैदान अशी एकाहून एक उत्कृष्ट मैदानं अस एक ना अनेक, ज्यांच्याबद्दल बोलू तेवढं कमीच .
गावाहून अनेक तरुण नशीब आजमवायला ह्या मायानगरीत येतात आणि इथलेच होऊन जातात.
हे शहर गुन्हेगारीतही नंबर वन आहे याशिवाय आतंकवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. आज पर्यंत अनेक हादसे, प्रलय, बॉम्बस्फोट, त्सुनामी, दंगल, अपघात ह्या मुंबईने बघितले पण म्हणून कोणी मुंबई सोडून पळ काढल्याची ऐकिवात नाही. कारण अशी कित्येक संकट झेलून पुन्हा उभ राहण्याची शक्ती या शहरात आहे.
Comments
Post a Comment