लख लख चंदेरी तेजाची...
लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया झळाळती कोटी ज्योतीया ssss चित्रपट!! रुपेरी पडद्यावरची एक लखलखती, चमचमती दुनिया . चित्रपट हा समाजाचा आरसा असतो! असतो? की होता ?असो!! भारतात आजतागायत दररोज कोट्यावधी प्रेक्षक चित्रपट बघतात. गेली तीस वर्ष भारताचा चित्रपट निर्मितीत संख्येने पहिला क्रमांक आहे. जवळपास 110 देशात भारतीय चित्रपट दाखवले जातात. लाखो लोकांची ही उपजीविका आहे एवढंच कशाला आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेची ही एक भक्कम पायरीच आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. खरं पाहायला गेलं तर चित्रपट कला भारतीयांना पाश्चात्त्यांकडून मिळाली व भारतीयांनी स्वतःच्या तंत्रकुशलतेने तीला मोठी केली. पुरातन काळी भारतात छाया- नृत्याचे प्रयोग केले जाता. दिव्याच्या प्रकाशाच्या सहाय्याने मध्यभागी लावलेल्या पडद्यावर त्यांची हालचाल छाया स्वरूपात दिसे. चीन-जपान मध्येही हा प्रयोग अस्तित्वात होता पण आपल्याकडील छाया नृत्याल...