Posts

मायानगरी!

Image
"ए दिलं है मुश्किल जिना यहा  जरा हटके जरा बचके ये है मुंबई मेरी जान" मुंबई म्हटल की प्रचंड गर्दी , मुंबई म्हटलं की लोकल्स ची धडधड, मुंबई म्हटल की घडाळाच्या काट्यावर चालणारी माणसं , मुंबई म्हटल की गाड्यांच्या गर्दीने नटलेले रस्ते आणि मुंबई म्हटल की दिवसभरात करोडोंची उलाढाल करणारे असंख्य उद्योग आणि त्यांच्यावर चालणारी कित्येक कुटुंब ! एक जिवंत शहर म्हणून कोणाचा उल्लेख करायचा झालाच तर नक्कीच  मुंबई पहिली डोळ्यासमोर येते.  झपाट्याने चौफेर वाढणारे शहर असा मुंबईचा उल्लेख केला जातो आणि त्यात वावगे असे काहीच नाही ..  मुंबईचं बारसं कोणी केलं यात एकवाक्यता नाही पण बॉम्बे म्हणा मुंबई म्हणा किवा मुंबापुरी म्हणा ...ही मायानगरी सर्वानाच वेड लावते यात काही शंका नाही.                     "हसण्याची गाण्याची मौजेची मुंबई                           रंगांची ढंगांची पाखरांची मुंबई                    सजण्याची ज...

सुंदर साजिरा श्रावण आला!

Image
                     हासरा नाचरा जरासा लाजरा                       सुंदर साजिरा श्रावण आला। कालचक्र हे अविरत फिरत असते. कोणासाठी ते थांबत नसते.  चैत्र पासून सुरु होणाऱ्या मराठी मासमालिकेतील प्रत्येक महिन्याचे रंगरूप वेगवेगळे असते.  कुणाला चैत्राच्या पालवीची मोहिनी पडते,  तर कोणाला वैशाखवणवा आवडतो, कुणाला मेघश्याम आषाढ हवाहवासा वाटतो, तर कुणी सोनेरी अश्विन साठी करता त्या सर्वांमधून सुसह्य किंवा आल्हाददायक जर कोणी असेल तर तो आहे "हिरवा श्रावण".  खरंच !! 'हिरवा श्रावण' नाव अगदी सार्थकी लागतं. त्या हिरव्या रंगाच्याही किती विविध छटा असतात. कुठे गर्द हिरवा , तर कुठे काळपट हिरवा,  तर कुठे पोपटी या सर्व रंग छटातुन चैतन्याचा, सौंदर्याचा साक्षात्कारच घडत असतो. इतर रंगांची ही उधळण झालेली असते, जणू काही आकाशातील ढग रंगपंचमी खेळत आहेत. ती निसर्गदृश्यही अतीव मनमोहक असतात. नुकतीच पावसाची सर येऊन गेली आहे, आकाश अजून सावळंच दिसतयं एक पुसटसा इंद्रधनुष्य त...

जाणता राजा!!

Image
  शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप।         शिवरायांचा आठवावा साक्षेप अवघ्या भूमंडळी।। असा संदेश देणाऱ्या श्री समर्थ रामदास स्वामींनी शिवरायांचा "श्रीमान योगी" असा सार्थ उल्लेख केला आहे.शिवरायां पूर्वी अनेक राजे होऊन गेले आणि नंतरही अनेक राज्ये उदयाला आली पण आज तीनशे वर्षानंतरही सर्वांना आदर्श राजा म्हणून आठवतात ते केवळ शिवरायच! सर्वांच्या  ओठी नाव आहे ते फक्त शिवरायांचेच!  सध्याच्या परिस्थितीत जेव्हा एखाद्या कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्वाची उणीव भासते तेव्हा भूतकाळातील या कर्तव्यकठोर थोर व्यक्तीची आपल्याला प्रकर्षाने आठवण होते.  'आज शिवाजी राजे असते तर ...!'लहानपणी हा निबंध बहुतेक जणांनी लिहिला असेलच, पण तेव्हा तो लिहिताना आपल्या देशातील प्रत्येक क्षेत्रातील अंदाधुंदीची जाणीव आपल्याला तीळमात्रही नव्हती. सोशल नेटवर्किंग साइटवर आज अनेक जण या महामानवा वर बोटं उठवताना दिसतात, नाव ठेवताना दिसतात. राजाचे सिंहासन हे रत्नजडित असतच पण काटेरी सुद्धा असतं.  आज तीनशे वर्षानंतरही महाराजांना त्याचे काटेरी पण अनुभवावे लागतेय यापे...

स्विकारून ही नमने सुमने!

Image
                         स्वीकारूनही नमने सुमने                                 आशीर्वच् द्यावा                                 नमोस्तुते गुरुदेवा। आषाढ सुरू झाला आणि धुवाधार बरसणाऱ्या वरुणाने गुरुपौर्णिमेची चाहूल दिली.  गुरु- शिष्य या नात्या बद्दल लिहिण्यासारखे जरा कठीणच!  गुरु म्हणजे नेमकं काय? आणि शिष्य म्हणजे नेमकं काय ? गुरु म्हणजे जो शिकवतो आणि शिष्य म्हणजे तो शिकतो बस एवढेच? कदाचित जो शिकवतो तो शिक्षक,  पण गुरु हा शिकवण्यापेक्षा बर्‍याच प्रकारचे ज्ञान देऊन जातो.  जे शब्दात मांडणं जरा अवघडच!  गुरू जीवनाचा मार्गदर्शक असतो, शिष्याला सन्मार्गावर नेतो, विविध विषयांची सखोल माहिती, शास्त्रांचे ज्ञान देतो. शिष्याला अंधकाराकडून प्रकाशाकडे जाण्याचे सामर्थ्य देतो. आपल्या सहवासाने, प्रेमाने, स्पर्शाने, भावनिक, वैचारिक जवळीकीने शि...

लख लख चंदेरी तेजाची...

Image
                        लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया                     झळाळती कोटी ज्योतीया ssss  चित्रपट!! रुपेरी पडद्यावरची एक लखलखती, चमचमती दुनिया . चित्रपट हा समाजाचा आरसा असतो! असतो? की होता ?असो!!  भारतात आजतागायत दररोज कोट्यावधी प्रेक्षक चित्रपट बघतात.  गेली तीस वर्ष भारताचा चित्रपट निर्मितीत संख्येने पहिला क्रमांक आहे. जवळपास 110 देशात भारतीय चित्रपट दाखवले जातात. लाखो लोकांची ही उपजीविका आहे एवढंच कशाला आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेची ही एक भक्कम पायरीच आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.  खरं पाहायला गेलं तर चित्रपट कला भारतीयांना पाश्चात्त्यांकडून मिळाली व भारतीयांनी स्वतःच्या तंत्रकुशलतेने तीला मोठी केली. पुरातन काळी भारतात छाया- नृत्याचे प्रयोग केले जाता. दिव्याच्या प्रकाशाच्या सहाय्याने मध्यभागी लावलेल्या पडद्यावर त्यांची हालचाल छाया स्वरूपात दिसे. चीन-जपान मध्येही हा प्रयोग अस्तित्वात होता पण आपल्याकडील छाया नृत्याल...

विज्ञानाच्या वाटेवर...!

Image
                 जय जवान !जय किसान !जय विज्ञान !  ही घोषणा म्हणजे भारताच्या प्रगतीचा मूलमंत्र आहे. जवान व किसान हे देशाचे दोन आधारस्तंभ आहेतच किसान पोटाची काळजी वाहतात ,तर जवान संरक्षणाची! भारताचे मा.जी पंतप्रधान कै. अटल बिहारी वाजपेयी यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या जय जवान! जय किसान !या उक्तीमध्ये जय विज्ञान! ही समर्पक भर घातली व त्यानुसार पोखरणच्या वाळवंटात कृतीही केली, आणि विज्ञान हा देखील भारताच्या प्रगतीचा एक आधारस्तंभ आहे हे सिद्ध केलं.  विज्ञान हा मानवाला मिळालेला एक प्रभावी डोळा आहे .विज्ञानाने माणसाला चाकाचे रहस्य सांगितले, रथ, बैलगाडी ,आगगाडी, विमान अगदीच काय तर आता रॉकेटच्या सहाय्याने मानव अंतराळात चंद्रावर जाऊन पोचला. विज्ञानाच्या सहाय्याने अनेक खते संकरीत बी बियाणे आणि कृषी अवजारे शोधून त्याने कृषी उत्पादनातही प्रचंड क्रांती केली. विज्ञानाच्या सहाय्याने माणसाने आपले जीवनमानही वाढवले. असाध्य आजारांवर त्याने मात केली.एकूणच काय मानवाच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्राला विज्ञानाने स्पर्श केला आहे. अनेक महान शा...

आम्ही सारे खवय्ये!

Image
चांद्यापासून बांद्यापर्यंत चा महाराष्ट्र विविधतेने नटलेला, निसर्गाने परिपूर्ण, भाषा मराठीचं पण तिथेही अनेक पैलू मालवणी ,वऱ्हाडी ,कोकणी. पण या सगळ्याबरोबर प्रकर्षाने आठवण होते ती फक्त पोटाला नाही तर "आत्म्याला तृप्त " करणाऱ्या मराठी पदार्थांची. खवय्यांसाठी म्हणजेच foodie बरं का ! तर foodie लोकांसाठी ही एक देणगीच ! आता या पदार्थांबद्दल काय बोलावं आणि  किती बोलावं आपल्याकडे म्हटलंच आहे की "माणसाच्या मनातला रस्ता त्याच्या पोटातून जातो "म्हणजे जेवण हे फक्त उदरभरणाचे काम करते असा समज कोणाचा क्वचितच होत असेल. नाश्त्याच्या पोह्या पासून परिपूर्ण, सुग्रास अनेक खाद्यपदार्थांनी नटलेले जेवणाचे ताट! प्रत्येकाबद्दल बोलावे तेवढे कमीच प्रत्येक सणावाराची स्पेशल डिश ठरलेली आणि ती एवढी परफेक्ट कधी कधी तर शंका येईल की ह्या डिशेस वरूनच सणवार ठरवले आहेत की काय !! अनेक पदार्थ हे प्रत्येक प्रांतात पिकणाऱ्या पिकावर अवलंबून असतात त्यामुळे प्रत्येकाची चव वेगळी. बरं प्रत्येक पदार्थांचा background सुद्धा ठरलेला आहे जसं की भजी खाण्याचं स्वर्गसुख हे पाऊस पडत असतानाच घेता येतं आणि सो...